खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चिंचखेडा बुद्रुक येथे वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवा मल्हार सेना, चिंचखेडा बुद्रुक यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार रवींद्र हिरोळे उपस्थित होते. तर अशोक निकम आणि संजय पाटील यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र हिरोळे म्हणाले की, आज राजा-महाराजांचा काळ नसला तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारातून लोककल्याणाचा आदर्श घालून दिला. आजच्या काळात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारख्या प्रशासकीय पदांवर जाऊन समाजहिताची कार्ये करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन ही पदे मिळवावीत आणि महापुरुषांच्या विचारांप्रमाणे लोकसेवा करावी.ते पुढे म्हणाले की, अनेक जयंती उत्सव डीजे, नाचगाणे आणि इतर अनावश्यक गोष्टींमध्ये साजरे केले जातात. मात्र वक्तृत्व स्पर्धांसारखे विधायक उपक्रम विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य आणि समाजासाठीचे योगदान समजून घेण्याची संधी देतात. युवा पिढीने या विचारांचा आदर्श घेत समाजहितासाठी कार्य करावे.स्पर्धेतील निकालानुसार गायत्री ब्रिजलाल कांडेलकर हिने प्रथम, प्राप्ती पुरुषोत्तम बावस्कर हिने द्वितीय, स्वाती मधुकर पाटील हिने तृतीय तर रक्षा विजय खोंदले हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थिनींनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.स्पर्धेत स्वाती मधुकर गावंडे, खुशी शांताराम तायडे, तेजस्विनी अरुण खोंदले, ऐश्वर्या पांडुरंग दिवाने, वेदिका देवानंद धनगर, तनुजा प्रवीण नमायते, जयश्री जितेंद्र तायडे, उत्कर्ष पांडुरंग दिवाने, लक्ष्मी शेषराव इंगळे, तनुष्का सुनील वाघ, संध्या भास्कर धनगर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेतील विजेते आणि सर्व सहभागी स्पर्धकांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र तायडे यांनी केले.यावेळी युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष गोविंदा संतोष वाघ, उपाध्यक्ष अजय रवींद्र वाघ, पद्माकर तायडे, सरपंच अर्जुन इंगळे, उपसरपंच भास्कर बोरसे, देवानंद नमायते, योगेश बोरसे, विजय खोंदले, धनराज वाघ, अभय वाघ, भूषण बावस्कर, अरुण वाघ, विकास वाघ, श्रावण वाघ यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा मल्हार सेना पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button