लग्नाच्या एका महिना अगोदरच नवरदेवाने केला वधूचा खून

*लग्नाच्या एका महिना अगोदरच नवरदेवाने केला वधूचा खून
*जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा येथील अचंबीत करणारी घटना बेलुरा येथील दीप्ती उर्फ कल्पना संदीप जाधव वय वर्ष (18) हिचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील एका तरुणासोबत 17 मार्च 2023 रोजी विवाह ठरला होता. परंतु लग्नाच्या एका महिना अगोदरच एक भयानक घटना घडली आहे. भावी नवरदेवानेच नवरीची हत्या करण्याची भयंकर घटना सवली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली आहे. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी वधू व वराकडील मंडळी जालना येथे आलेली होती. त्यांच्यासोबत नियोजित वर सुद्धा आलेला होता. परंतु तो त्या बसत्याच्या ठिकाणाहून अचानक गायब झाला. त्यावर आणि थेट वधूचे मंठा तालुक्यातील बेलोरा हे गाव गाठले. वधूच्या घरचे सर्व मस्त बांधण्यासाठी जालना येथे गेले असता वधू दीप्ती उर्फ कल्पना एकटीच घरी होती. आणि याच वेळेस भावी नवरदेवाने तिच्या गळ्यावर वार केले. वार इतकी भयानक होते की तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच सर्व गावातील नागरिक मुलीच्या घराकडे धावत आले. परंतु तोपर्यंत आरोपी नवरदेव तिथून फरार झाला. घटनास्थळी शेवली पोलीस हजर झाले असून पंचनामा करीत आहेत दरम्यान गावातील नागरिक संतप्त झाली आहेत त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवले आहे. अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व तसेच मोजपुरी पोलीस स्टेशनतील सर्व दाखल झालेली आहे. भावी नवरदेव बसता बांधण्याच्या वेळेसच खून करून पसर झालेला आहे.



