खानदेशजळगावा जिल्हा

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे 25 व 26 रोजी शिबिरविनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक वहॅण्ड सर्जरी शिबिरासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

जळगाव – रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नावनोंदणी करावी, असे आवाहन मेडिकल सर्विस डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांनी केले आहे.
या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम हे येणार आहे. या शिबिरात हातासह बोटाच्या व्यंगाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जळालेले व्यंग भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्म: असलेले हाताचे, पायाचे व शरिावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार केले जाणार आहे. हे शिबिर संपूर्ण: मोफत असून नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
नावनोंदणीसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील मार्केटिंग विभागातील मकरंद महाजन यांच्याशी 9765271188, रो.डॉ.अशोक पाध्ये व रो.डॉ.वैजयंती पाध्ये यांच्याशी भास्कर मार्केट, जळगाव येथे किंवा मोबाईल क्रमांक 9822637884, सुशील टायर हाऊस, लक्ष्मी टॉवर, जळगावचे 9372266779, रो.डॉ.गोविंद मंत्री, गोल्ड सिटी हॉस्पिटल यांच्याशी 0257-2224777 या क्रमांकावर संपर्क साधावा. या भव्य विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाईटचे अध्यक्ष रो.अजित महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.वैजयंती पाध्ये, डायरेक्टर मेडिकल सर्विसचे रो.डॉ.वैभव पाटील, सचिव रो.अभिषेक निरखे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button