रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी च्या अध्यक्षपदी सुमित जगताप यांची निवड.

दिवा – (सचिन शेलवले )
मंगळवार दि २० जून 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी या क्लबच्या वर्धापन दिना निमित्त नवीन अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी जिल्हा 3142 प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी तसेच उपप्रांतपाल शैलेश गुप्ते उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष सुमित जगताप यांना अध्यक्ष पदाचा तर वर्षा शाह यांना सचिव पदाचा कारभार सोपवण्यात आला. या प्रसंगी चार्टर्ड अध्यक्ष रोटरियन सचिन म्हात्रे यांनी नवीन अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष सुमित जगताप यांनी याप्रसंगी सीनियर सिटिज़न क्लब ची स्थापना, आरोग्यविषयक, आर्थिक साक्षरता, हैप्पी स्ट्रीट, पर्यावरणपूरक गणपती मूर्त्यांचे विसर्जन, रक्तदान शिबिर, दुर्बल घटकांचे विमा व संगोपन, महिला सक्ष्मीकरण व असे अनेक कार्यक्रम राबवण्याची हमी दिली.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी रोटरियन सारिका पवार, रेनू अग्रवाल, मीना, कामाक्षी, मुरली अय्यर, कपिल गुप्ता, बिपीन आचार्य, दीपाली कटके, स्वरा जगताप, मोनिका शिंदे, उमा अय्यर, महेंद्र कटके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पा म्हात्रे यांनी केले. याप्रसंगी क्लब मधील सर्व सदस्यांनी सुमित जगताप यांना कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



