खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा काँग्रेस कमिटीने २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील शाहिदांना केले अभिवादन! व संविधानाची शपथ घेऊन केला संविधान दिन साजरा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे

दि.२६;
तेल्हारा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज २६ नोव्हेंबर ,२००८ मधील मुंबई येथिल हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच अशोक वाटिका ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेल्हारा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तेल्हारा तालुक्यातील सर्व काँगेस पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी तथागत गौतम बुद्ध व महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून त्यांचे पूजन करत त्यांना वंदन केले .यावेळी उपस्थित काँगेस पदाधिकारीं कडून संविधान जिंदाबाद चे नारे व घोषणाबाजी करण्यात आली नंतर सर्वांनी एकत्रित संविधान उद्देशिकेचे वाचन केले व भारतीय संविधानाची शपथ घेऊन संविधान दिन साजरा केला. हा कार्यक्रम तेल्हारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप भाऊ खारोडे यांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी सर्व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button