बुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भशेती

पांगरी कुटे येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पांगरी कुटे येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : 12 फेब्रुवारी

मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे गावात 11 फेब्रुवारी रोजी रात्री 38 वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली आहे. मयत शेती आणि बचत गटाच्या कर्जामुळे तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पांगरी कुटे गावातील रहिवासी डिगांबर आनंदा कुटे (वय 38) हे पांगरी कुटे शेत शिवारातील गट क्रमांक 430 मधील त्यांच्या शेतात गव्हाची राखण करण्यासाठी दररोज जात होते. 11 फेब्रुवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते त्यांच्या शेतात राखणी साठी गेले होते.
दिगंबर कुटे हे 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती शेजारील शेतकऱ्याने मृताचे चुलत भाऊ परसराम वामन कुटे यांना फोनवरून दिली. पांगरी कुटेचे पोलिस पाटील प्रकाश कुटे यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव भगत, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे, नायब पोलिस कांस्टेबल शैलेश ठाकूर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगांव च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
याबाबतीत मयताचा चुलत भाऊ परसराम वामन कुटे वय 40, रा. पांगरी कुटे, तालुका मालेगाव यांनी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता दिलेल्या फिर्यादीवरून मालेगांव पोलीस स्टेशन मध्ये मर्ग क्रमांक 08 / 2023 नोंदवून फौजदारी संहितेच्या कलम 174 नुसार प्रकरण दाखल केले आहे.
सदर घटनेचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक गुणवंत गायकवाड करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button