जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सामान्य कुटुंबातील तरुणाने घेतली नगर रचना अधिकारी पदाची झेप

रुईखेडा हे मुक्ताईनगर तालुक्यातील दुर्गम आणि उपेक्षित असे गाव आहे. दलित वस्तीही तशी जेमतेम आहे.मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन नरेंद्र गुरचळ नावाचा तरुण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतो, ही गोष्टच मुळात अतुलनीय आहे.नरेंद्र गुरचळ यांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि नंतर गावातीलच हायस्कुल मध्ये दहावी पर्यंत शिक्षण पार पडले आहे. नरेंद्र गुरचळ हे आधी नगर रचना विभागातच कार्यरत होते. या वर्षीच्या एम पी एस सी च्या सन २०२३ च्या परीक्षेत नरेंद्र गुरचळ यांनी घवघवीत यश मिळवून वर्ग एक च्या पदाला गवसणी घातली आहे.विशेष म्हणजे गुरचळ यांनी या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा नंबर पटकावला आहे. त्यांच्या यशाबद्दल गावाला सार्थ अभिमान आहेच, मात्र गुरचळ हे स्पर्धा परीक्षेत नशीब अजमावणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा बनले आहेत .सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button