मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज मंजूर करून त्यांच्या खात्यात रक्कम टाकावी.उषा जाधव माजी जि प सदस्य, यांची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव :- संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत असून यासंदर्भात पात्र असलेल्या लाभार्थीनी मालेगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांन सह महिलांनी अर्ज पटवारी मार्फत तहसील कार्यालयात संबंधित विभागात जमा केले असून, त्यांना मात्र अद्याप मिळणारी रक्कम जमा झाले नसल्याने लाभार्थी वाटपाहुन आहेत, शासनाने जाहिर केलेल्या योजना लोक हिताच्या दृष्टिकोनातून चांगल्या आहेत, जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना, देन्यात आला आहे, तसेच या वयोश्री योजनेचा लाभ देन्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जि प सदस्य उषा जाधव यांनी केली असून, मालेगांव सह जिल्ह्यातील या योजनेसाठी हजारो पात्र असलेल्या लाभार्थीनी अर्ज दाखल केले असून त्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता च्या आगोदर अर्ज मंजूर करून त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले पाहिजे असे ही उषा जाधव यांनी प्रतिनिधी शि बोलताना सांगितले, तहसिल कार्यलयात या संदर्भात चौकशी केली असता आम्ही तालुक्यातील प्राप्त झालेले अर्ज वाशिम समाजकल्याण विभाकडे जमा करण्यात आले असल्याचे सांगतात, याबाबिकडे लोकप्रतिनिधी व संमधित तहसीलदाराने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उषा जाधव यांनी केली आहे.



