बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 मध्ये जनुना प.स. खामगांव शाळेचे घवघवीत यश


जी डी रोकडे प्रतिनिधी
दिनांक 15 जुलै 2026 रोजी कालिदास जयंती उत्सव व 150 वी राष्ट्रिय वंदेमातरम गीत वर्धापन दिनानिमित्त आयोजित देश पातळीवरील नाट्य स्पर्धेत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जनुना ता.खामगाव नी सहभाग घेवून देश पातळीवर आपल्या शाळेचा गौरव वाढवीला.

    कवी कालिदास यांच्या जयंती निमित्त व वंदेमातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिना निमित्त भारत सरकार च्या संस्कृती संवर्धन विभागाने नाट्य स्पर्धा आयोजित केली होती.या कार्यक्रमात देशातील निवडक 40 शाळांनी सहभाग घेतला यात महाराष्ट्रातील 3 शाळा होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रसमन्वक डॉ. देवकर सर तर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजीवनी ताई हरमकार होत्या. मुख्याध्यापक श्री.गावंडे सर यांच्या नियोजनात कार्यक्रम पार पडला.

    यात जनुना शाळेने महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात दहीहंडा जि-अकोला या गावात गो.ग. आगरकर यांच्या पत्नी यशोदाबाई यांनी खाऱ्या पाण्याच्या विहिरीपासून मीठ बनवून सविनय कायदेभंग केला. हा प्रसंग नाट्य स्वरूपात जनुना शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला.

 यात रेणुका गुरेकार, भाग्यश्री हजारें, ख़ुशी सोळंके, ज्ञानेश्वरी कोंडे, संजना पारस्कर, भक्ती सनानसे, चैतन्य हरमकार, तुषार पारस्कर, रोहन हरमकार,अभिषेक सोळंके, उद्धव सुरडकर,सार्थक हरमकार,गोपाल कोंडे, पवन साबे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 पटकथा लेखन संतोष मनसुटे सर यांनी,तर दिग्दर्शन श्रद्धा जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.सुनिता आढे मॅडम यानी केले.महोत्वाचे चित्रीकरण श्री.अरुण पुरी सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी कारण्यास श्री.तुळशीदास तोंडे सर,श्री.गणेश अंबुलकर सर तथा श्री.चंद्रभान डोईफोडे यांनी विशेष सहकार्य केले.

विद्यार्थी तथा पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button