खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

रावेर लोकसभा अंतर्गत विविध रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळणे बाबत, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांची भेट…

रावेर लोकसभा अंतर्गत नांदुरा, मलकापूर, बोडवड, निंभोरा, रावेर व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे विविध एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळणे बाबत, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णवरेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान भेट घेऊन मागणी केली.

यावेळी बोदवड येथे नवजीवन एक्सप्रेस 12655/56, सुरत अमरावती एक्सप्रेस 20925/26, आझाद हिंद एक्सप्रेस 12129/30, नांदुरा येथे जयपूर हैद्राबाद डेक्कन एक्सप्रेस 12719/20, प्रेरणा एक्सप्रेस 22137/38, नागपूर पुणे गरीबरथ 12113/14, रावेर येथे महानगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस 22177/78, निंभोरा येथे अमृतसर पुणे एक्सप्रेस 11057/58, भुसावळ येथे टेक्निकल हाल्ट राजधानी एकस्प्रेस 22221/22 व मलकापूर येथे पुणे अमरावती एक्सप्रेस 22117/18, नागपूर पुणे गरीबरथ 12113/14 या रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णवरेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांना मागणी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button