खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

रात्रीची पोलिस गस्त वाढवण्याची आदिवासी संघटनेची मागणी

कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर : कुऱ्हा वढोदा परिसरात भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने कुऱ्हा पोलिसांना निवेदन देण्यात आले.
मुकेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली
संघटनेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष बालाजी सोनवणे, उपाध्यक्ष राजु तडवी यांच्या नेतृत्वात संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहा. पोलीस निरीक्षक जयेश पाटील यांची कुऱ्हा दुरक्षेत्र कार्यालयात भेट घेतली. कुऱ्हा वढोदा परिसरात शेती शिवारातील मोटरपंप, ठिबक, सोलर झटका मशीन व पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी चोरटे गावात दिसल्याने सुळे व परिसरातील बऱ्याच गावात चोरट्यांच्या धाकाने ग्रामस्थ भयभीत आहेत. कुऱ्हा चौकीचे पोलीस नियमित गस्त घालत आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा गस्त वाढविल्यास चोरट्यांच्या मनात धाक निर्माण होऊन चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल त्यामुळे रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. याप्रसंगी रवींद्र हिरोळे, नारायण इंगळे, कृष्णा जुमळे, ज्ञानेश्वर इंगळे, विनायक हिरोळे, अतिश इंगळे, सुमित जुमळे, विजय इंगळे, महिंद्र पाटील, नाना पाटील, दिलीप पाटील, दीपक पाटील, रोहन पारधी, जोंधनखेडा सरपंच कुरबान तडवी, साबीर तडवी, मुजाफर तडवी, मनोज तडवी, शारुक पठाण, आरिफ तडवी, सुलेमान तडवी, शारुक तडवी, आर्यन तडवी उपस्थित होते.
चौकट
रात्रीची गस्त वाढली
यावेळी सहा. पोलीस निरीक्षक जयेश पाटील, चौकीचे हवालदार मेजर अशोक जाधव यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच मेजर अशोक जाधव, पो. कॉ. सागर सावे, प्रवीण जाधव, अनिल देवरे, श्रावण सोनवणे, अंकुश बावस्कर यांच्या पथकाने रात्रीच कुऱ्हा वढोदा परिसरातील गावांमध्ये रात्रीची गस्त सुरू केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button