बुलढाणामहाराष्ट्र

ग्रामपंचायत पळशी झाशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य वृक्षारोपण तथा पत्रकार सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 


तालुका प्रतिनिधी संग्रामपूर, 


 रतन भगत. 


           सविस्तर वृत्त असे की  संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी झाशी मार्फत दिनांक 13 /1 /2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात करत असलेले योगदानाबद्दल भव्य पत्रकार सन्मान पुरस्कार सोहळा तसेच वृक्षारोपण करण्यात आले. 
      त्यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांना डायरी पेन आणि सन्मानचिन्ह देण्यात आले .सुरुवातीला गावाच्या बाजूला चांगल्या क्वालिटीचे नारळाचे झाड रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले. 
     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पळशी झाशी येथील स्वर्गवासी केशवराव घाटे अण्णा यांच्या पत्नी शांताबाई केशव घाटे ह्या होत्या ,तर प्रमुख उपस्थितीमध्ये संग्रामपूर तहसीलदार श्री प्रशांत पाटील साहेब गटविकास अधिकारी माधवजी पायघन साहेब ,मंचावर गावचे सरपंच सौ .प्रियंका राहुल मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार ,ग्रामविकास अधिकारी हेमंत देशमुख, मंडळ अधिकारी माननीय श्री बुरजे साहेब ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री भाऊ भोजने ,माननीय श्री रामेश्वर गायकी ,माननीय श्री वासुदेवराव दामधर ,माननीय श्री ज्ञानेश्वर दांदळे ,माननीय श्री मीर मकसूद अली , माननीय श्री भगवान भाऊ पाखरे, माननीय श्री संजीव भाऊ मारोडे,माननीय श्री संतोष भाऊ निकाळजे ,माननीय श्री विजय भाऊ मारोडे, ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री सुरेश भाऊ हेलगे ,माननीय श्री अनंता भाऊ आमले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 
       त्यानंतर दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा मोठ्या आदराने पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह पेन व डायरी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल मेटांगे यांनी केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शन गटविकास अधिकारी माधव पायघन तहसीलदार प्रशांत पाटील साहेब जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने ,रामेश्वर गायकी भगवान पाखरे यांनी केले. त्यावेळी सर्व माजी सैनिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन गावचे तलाठी रंगदाड साहेब व बाजोडेताई यांनी केले तर आभार प्रदर्शन हे सचिव हेमंत देशमुख यांनी केले. 
  सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,आशा वर्कर ,बचत गट प्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. सरपंच झाल्यापासून गावात वेळोवेळी कामाची दखल घेत सर्व पत्रकार बांधवांनी पळशी झाशी ग्रामपंचायत चा कार्याचा अहवाल नेहमीच सादर केला .त्यामुळेच त्यांचा केलेला सत्कार आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, त्यांच्यामुळेच मला व आमच्या ग्रामपंचायतला चार राज्यस्तरीय व एक जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला .तसेच तहसीलदार साहेब गटविकास अधिकारी साहेब यांनी गावाच्या विकासात नेहमीच मदत करून गाव समृद्धीच्या वाटेवर नेले .व सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली .त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार पळशी झाशी येथील लोकनियुक्त सरपंच सौ प्रियंका राहुल मेटेंगे यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button