राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या; बुलढाणा जिल्ह्यातही कलेक्टर बदलाचा मोठा निर्णय….!

राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या; बुलढाणा जिल्ह्यातही कलेक्टर बदलाचा मोठा निर्णय….!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- ३ एप्रिल २०२६
किरण पाटील यांची बदली; प्रवीण कुमार देवरे यांची नवीन नियुक्ती…राज्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शासनाने मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार विविध विभागांतील अधिकाऱ्यांची फेरबदल करण्यात आली असून, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कलेक्टर पदाचा ही समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी किरण पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण कुमार देवरे यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे जिल्हा प्रशासनात मोठा बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.शासनाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पदावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सध्याच्या पदाचा कार्यभार व्यवस्थितपणे हस्तांतरित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या बदल्या प्रशासकीय गरज तसेच काही प्रकरणांमध्ये विनंतीनुसार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.दरम्यान, या आदेशाची नोंद “Supreme” प्रणाली तसेच ई-एचआरएमएस (e-HRMS) Electronic Human Resource Management System मध्ये अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.बुलढाणा जिल्ह्यात नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे विविध प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन कलेक्टर म्हणून प्रवीण कुमार देवरे यांच्याकडून विकासकामां मध्ये वेग येईल, अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे…..



