बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

राज्यस्तरीय दक्षता पथकाने जिल्ह्यात अवैध बायोडिझेलचा पर्दाफाश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

बुलढाणा जिल्ह्यातील अन्न व नागरी
पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जिल्ह्यात अवैध बायोडिझेल वापराचा पर्दाफाश केला. मेहकर तालुक्यातील मोकळ्या जागेत तसेच सिंदखेडराजा येथील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोर सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपावर धडक कारवाई करण्यात आली. राज्य दक्षता पथक, मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या कारवाईत सुमारे २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये एक मालमोटार ट्रकसह बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच Ashok Leyland कंपनीचा ट्रक, भूमिगत लोखंडी टाकी, डिस्पेन्सर युनिट, डिझेल साठा, पाइप व इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले. नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री व साठवणूक केली जात
असल्याचे निदर्शनास आले. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार जप्त करण्यात आलेला बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक पोलीस व पुरवठा विभागाकडून पुढील तपास वेगाने करण्यात येत आहे. या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश विजय बिजनावर, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरे यांच्यासह शिधावाटप निरीक्षक व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध इंधन व गॅस तस्करीविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button