खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

धर्म या संकल्पने पेक्षा मानवता श्रेष्ठ आहे : जयसिंग वाघ

अमळनेर :- धर्म हि संकल्पना हजारो वर्षां पासून चालत आली आहे , धर्म मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ असल्याने त्याचे अनुसरण करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगून माणसांना धार्मिक बनविण्यात धर्मगुरू यशस्वी झाले आहेत , धर्म माणसा माणसात प्रेम निर्माण करतो , धर्म माणसाचा इश्र्वराशी संवाद साधतो , तो मृत्यू नंतर आपल्याला स्वर्गात स्थान देतो असे गोंडस वाक्य वापरून धर्म माणसाला आपल्याकडं आकर्षित करत आला . यात माणूस हजारो वर्षां पासून अडकत आला आहे . धर्म मानवतेची , प्रेमाची , शांततेची शिकवण देत असला तरी जगात सर्वात जास्त लोकांचा बळी धर्माने घेतले आहेत असे परखड मत प्रसिध्द साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे अमळनेर येथे १७ ऑगस्ट रोजी आयोजित ‘ सर्व धर्म परिषद ‘ मध्ये वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की धर्म या संकल्पने पेक्षा मानवता श्रेष्ठ आहे , धर्मा धर्मात संघर्ष होतो तेंव्हा तो संघर्ष मानवतावादी लोक पुढाकार घेवून मिटवत आलेले आहेत . मानवतावाद जिवंत आहे म्हणून धर्म जिवंत आहे हे जर प्रत्येक धर्माने समजून घेतले तर जगात येक नवी क्रांती होवू शकते . ती क्रांती यशस्वी झाली तर वंशवाद , जातीयवाद , धर्मभेद गळून पडेल व मानविहत्या रोखण्यात , मानवाचे जीवन सुखमय करण्यात आपल्याला यश मिळेल . हजारो वर्षांपासून धर्म प्रेमाची शिकवण देत आला पण सर्वात जास्त हिंसा माणसाने धर्मा साठीच केलेली आहे . धार्मिक युध्ये वीस वीस वर्षे चालली आहेत व त्यात लाखो लोकांचे नाहक बळी गेलेले आहेत . भारतातही धर्माच्या नावावर लाखो लोक आपल्या प्राणास मुकले आहेत असेही वाघ यांनी स्पष्ट केले . जगातील प्रत्येक धर्माने महिलांना तुच्छ लेखले आहे , प्रत्येक धर्मात पुरुषसत्ताक व्यवस्था आहे , प्रत्येक धर्माचे संस्थापक पुरुष आहेत , सर्वधर्म परिषद घेण्याचे व धर्मा धर्मात सामंजस्य निर्माण करण्याचे काम धर्मगुरूंचे असताना महिला सर्वधर्म परिषद घेताहेत ही एक ऐतिहासिक व दिशादर्शक बाब आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले .
मंचावर साध्वी प्रमेदिता , भिख्खू नागसेन , मकसुदभाई बोहरा , केरसी करांजिया , संत बाबा धीरज सींघजी , मुफ्ती हरून नदवी, रेव्हरंड विशाल वळवी , वेदमूर्ती भागवतकार अमोल शुक्ल ई. मान्यवर होते .
मुफ्ती हरून नदवी यांनी अतिशय आवेशपूर्ण भाषण करून हिंदू मुस्लिम धर्म कसे एकच आहेत याचे विश्लेषण केले .
भदंत नागसेन यांनी बौद्ध धर्म आजच्या काळात कसा उपयुक्त आहे आहे याबद्दल माहिती सांगितली . अन्य धर्मगुरूंनी आपापल्या धर्माचे महत्व विषद केले .
नॅनो संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. एल. के. पाटील यांनी धर्माची शिकवण व मानवाचे प्रत्यक्ष आचरण कसे भिन्न आहे याचे सविस्तर वर्णन करून धर्मव्यवस्थेवर प्रखर टीका केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार तथा राष्ट्रीय. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व मंचावरील धर्मगुरू तथा अन्य निमंत्रितांशी प्रत्यक्ष संवाद साधला .
डॉ. अपर्णा मुठे , सरोज भांडारकर , कांचन शहा , वसुंधरा लांडगे या महिलांच्या पुढाकाराने ही परिषद घेण्यात आल्याने त्यास आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले , अमळनेर पोलीस स्टेशन ने परिषदेच्या यशस्वीते करिता विशेष परिश्रम घेतले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button