Uncategorized
अकोट विधानसभा मतदारसंघातिल म.वि. आ. चे अधिकृत उमेदवार महेश दादा गणगणे यांच्या प्रचारार्थ आज तेल्हारा शहरात भव्य पदयात्रा व जाहीर सभा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे
तेल्हारा
प्रतिनिधी दि. 17 नोव्हें. | महाविकास आघाडी कडून अकोट-तेल्हारा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ तेल्हारा शहरात दुपारी 04:00 वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महाविकास आघाडी तर्फे सायंकाळी 07:00 वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मार्केट तेल्हारा येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील व ग्रामीण भागातील महाविकास आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी तसेच मतदार नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे.




