जळगावा जिल्हा

यशप्राप्तीसाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाचीसौ रोहिणीताई खडसे -खेवलकर

यशप्राप्तीसाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची
सौ रोहिणीताई खडसे -खेवलकर
” जीवनामध्ये काहीतरी संपादित करायचे असेल तर त्यासाठी घरची परिस्थिती, पैसा या गोष्टी गौण आहेत. मनामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, अपयशाने कधीच खचून जाऊ नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.मला ‘ हे ‘ बनायचं आहे म्हणजे बनायचं आहे, आपले ध्येय निश्चित करून स्वप्नपूर्ती साठी त्या जिद्दीने अहर्निश प्रयत्न केल्यास तुम्ही यशाला गवसणी घालून आई-वडिलांचे नाव रोशन करू शकतात. शाळेकडून जे – जे हवं असेल तेथे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ” असे प्रतिपादन सौ रोहिणीताई खडसे- खेवलकर यांनी केले.
त्या नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी खुर्द येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यामध्ये उद्घाटनपर भाषणात बोलत होत्या, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक चंद्रशेखर बढे तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे डिपार्टमेंट इगतपुरी येथे केंद्रीय सेवेत असलेले विद्यालयाचे माजी विद्यार्थी बबलू दिनकर कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी निमखेडीचे सरपंच गणेश धुंदे, मुख्याध्यापक विकास चौधरी सर, स्थानिक संचालक प्रदीप साळुंखे, विकासो चेअरमन राजूभाऊ लवांडे, संचालक नामदेव डहाके, माजी मुख्याध्यापक डब्ल्यू के बढे, ग्रा.प. सदस्य प्रवीण डहाके, गॅस मेकॅनिक नरेंद्र तीवसकर, स्वप्नपूर्ती क्लासेसचे संचालक नरेंद्र सापधरे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सौ रोहिणीताई यांनी इयत्ता दहावी परीक्षेतील सर्व यशस्वीतांचे कौतुक करून अभिनंदन केले आणि भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पुढे त्या म्हणाल्या की,निमखेडी खुर्द गावातील विद्यार्थी अतिशय मेहनती आहेत, मिलिटरी भरती, पोलीस भरतीसाठी सराव करण्यासाठी शाळेचे भव्य पटांगण उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात.. गावात सुसज्ज ग्रंथालय असून ग्रंथालयाचा लाभ बरेच विद्यार्थी घेत असतात. अशा हुशार आणि होतकरू विदयार्थ्यांसाठी कधीच पुस्तकांची कमी पडू देणार नाही, आमचे विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत याच उद्देशाने शाळेचे वाचनालय सुद्धा समृद्ध केले आहे. या वाचनालयातून पुस्तके घेऊन अवांतर वाचनातून विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक पातळी उंचवावी असे आव्हान रोहिणीताईंनी केले. प्रसंगी उत्कृष्ट नियोजनाबद्दल शालेय प्रशासनाचे कौतुक केले. सुरुवातीला कु. एकता वाघ या विद्यार्थिनीने शाळेचे बदलते स्वरूप याविषयावर अतिशय प्रभावी विचार मांडले.यावेळी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बढे यांनी रुईखेड गावाचे उदाहरण देऊन गावातील बहुसंख्य विद्यार्थी नोकऱ्यांच्या निमित्ताने शहरात गेल्याने दिवसेंदिवस गाव खाली खाली होत असल्याचे स्पष्ट केले. हीच अपेक्षा त्यांनी निमखेडी खुर्द गावाकडून व्यक्त केली. शिक्षणाशिवाय जीवनात परिवर्तन नाही… व्यासपीठावर उपस्थित माजी विद्यार्थी बबलू कोळी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने परिस्थितीवर मात करून आणि भविष्यात प्रमुख पाहुणे म्हणून या शालेय व्यासपीठावर यावे असे आवाहन श्री बढे यांनी केले यावेळी माजी विद्यार्थी श्री बबलू कोळी यांनी त्यांच्या मनोगतातून शालेय शिस्तीचे महत्व विशद केले, याच शाळेत मी लहानचा मोठा झालो सर्व चांगल्या गोष्टी शाळेतूनच घेतल्या त्याच शिदोरीवर मी आज सरकारी नोकरीत काम करीत आहे असे सांगून शाळेविषयी ऋण व्यक्त केले. ” झुकेगा नही साला ” या डायलॉगमधून मोठमोठी स्वप्न पहा आणि स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबू नका असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल विद्यालयाचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी स्थानिक चेअरमन श्री नारायणराव चौधरी,स्वप्नपूर्ती क्लासेसचे संचालक नरेंद्र सापधरे सर व गॅस मेकनिक नरेंद्र तिवसकर,दत्तकृपा बुक डेपो चे संग्राम पाटील,यशराज कॅन्स्ट्रक्शनचे दीपक साळुंखे,कीड टूचे संचालक श्री अविनाश नाईक सर आदींनी प्रत्येक कार्यक्रमांस 100 रु. देऊन कलाकार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विकास चौधरी सर यांचे मार्गदर्शना खाली सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख एच पी झोपे शिक्षक श्री के आर कवळे, पी के सावळे, क्रीडा शिक्षक ए एन चव्हाण, के एन कोसोदे, श्रीम. एन के होले, श्रीम. पी एल फेगडे, कर्मचारी धनराज घोगरे, आशिष तडवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी आशिष टेन्ट हाऊस मुक्ताईनगर व भावेश मराठे निमखेडी खुर्द यांचेसह शालेय विद्यार्थ्यांचे आणि गावाकऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
चौकट…
विविध पारितोषिकांसाठी रकमा जाहीर
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी दहावीतील गुणवंताना बक्षीस देण्यासाठी श्रीमती कुसुम मुरलीधर चौधरी पारितोषिक 11 हजार, कै रघुनाथ लक्ष्मण घोगरे पारितोषिक 5 हजार, श्री दिनकर लहू कोळी पारितोषिक साठी 5 हजार रुपये देणगी जाहीर करण्यात आली.या ठेवीतून आलेल्या व्याजाच्या रकमा संबंधिताना पारितोषिक म्हणून देण्यात येतील. याशिवाय गुणवंताना ट्रॉफी देऊन सन्मानित करावे यासाठी चंद्रशेखर बढे यांनी पाच हजार रुपयांची देणगी विद्यालयाला दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button