यांना दुर्गा सोनवणे यांना कृषी विद्यापीठाचा पुरस्कार!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
P. D. दांडगे (जळगाव जामोद)
(जळगाव जामोद)ता.1: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मधील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने सोमवार(ता.1)विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेडावा व स्त्रीशक्ती उत्सव साजरा करण्यात आला.
मेळाव्यामध्ये स्थानिक कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद च्या संपर्क शेतकरी व महिला उद्योजक दुर्गा सुनील सोनवण यांच्या विद्यापीठाकडून प्रेरणा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या पुस्तकाचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा वाशिमच्या जिल्हाधिकारी बुबनेश्वरी एस. , संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे. अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यान विद्या डॉक्टर देवानंद पंचभाई, रिलायन्स फाउंडेशनचे सचिन महातळे व संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर धनराज उंदीरवाडे व्यासपीठावर होते. दुर्गा सोनवणे यांनी आपले कार्य कुशलतेने, जिद्दीने व पथक प्रयत्नांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या जिद्दीला पाहून गावातील महिला सुद्धा आता पुढे येत आहेत. त्यांनी यशाचे श्रेय कुटुंबातील सदस्य व कृषी विज्ञान केंद्राला दिले. त्यांच्या या समस्यांबाबत सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे, संस्थेच्या कोषाध्यक्ष स्वाती वाडेकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख विकास जाधव, विषय ज्ञ डॉक्टर विनोद जाणवतकर, शामसुंदर बोर्डे, अनिल गाभणे, संजय उमाळे, नितीन तडोकार व शशांक दाते यांनी त्यांचे अभिनंदन केले.



