मेडशी येथे आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली धावती भेट

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले
आमदार सदाभाऊ खोत
माजी कृषी राज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष रयत क्रांती संघटना हे आज रोजी दौऱ्यावर असताना मेडशी या गावांमध्ये त्यांनी शेतकरी बांधव तसेच मेडशी दुर्गम भागातील गरीब आदिवासी समाजातील लोकांनची भेट घेऊन नागरिकांच्या शेतीविषयक विविध प्रश्नावर व समस्या,चर्चा करून मेडशी येथील पाणीमापक यंत्रणा बिगाडी विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ध्वनी यंत्र द्वारा नागरिका समक्ष चौकशी केली तथा इतर शासकीय योजनेच्या लाभा बदल माहिती ची विचारपूस करून शासकीय व शेती विषयक कामाच्या काही ही समस्या उद्भवल्यास मी खंबीरपणे नेहमी आपल्या पाठीशी उभा राहीन. असे आश्वासन देऊन. शेतकरी वर्ग, आदिवासी तसेच इतर समाजातील नागरिकाशी चर्चा केली. यादरम्यान मेडशी गावातील नागरिकांनी शाल पुष्पगुच्छ देऊन आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वागत केले.तसेच मेडशी येथील प्रतिष्ठित नागरिक दत्ताभाऊ घुगे यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी परिस्थितीमध्ये दत्ताभाऊ घुगे, मनोज मुंडे, विठ्ठल भागवत, राजदार खा पठाण, नितीन तायडे,शेख अक्रम, सर्वेश खंडेलवाल, आकाश घुगे, सागर माने, रोहित बांडे, जीवन धदारे , वसंता जटाळे, इरफान रेगिवाले व तसेच मेडसी गावातील बहुसंख्यिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले
यांच्याकडून देण्यात आले.



