बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अनुसरून चिखली मतदारसंघातील जलसंपदा प्रश्नांना गती..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जलसंपदा, सिंचन व पूर संरक्षणाच्या कामांना गती देण्याच्या धोरणानुसार चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयातील जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली मतदारसंघातील विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाशी संबंधित पाच महत्त्वाचे विषय बैठकीत प्रभावीपणे मांडले. या सर्व विषयांवर जलसंपदा विभागाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

विषय क्रमांक १ : जांबवंती नदीवर पूर संरक्षक भिंत
चिखली शहरातून वाहणाऱ्या जांबवंती नदीच्या दोन्ही काठांवर पूर संरक्षक भिंत उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पूररेषा निश्चिती व प्रशासकीय मान्यतेचा विषय आमदार श्वेता महाले पाटील यांनी प्राधान्याने मांडला. या प्रस्तावाला गती देण्याबाबत विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

विषय क्रमांक २ : ब्राह्मणवाडा संग्राहक तलावाची उंची वाढ
ब्राह्मणवाडा संग्राहक तलावाची उंची वाढवून अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे व अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याबाबत व

विषय क्रमांक २ : ब्राह्मणवाडा संग्राहक तलावाची उंची वाढ
ब्राह्मणवाडा संग्राहक तलावाची उंची वाढवून अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे व अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याबाबत विभागाने सकारात्मक भूमिका घेतली.

विषय क्रमांक ३ : कोलारी लघुपाटबंधारे योजना हस्तांतरण
कोलारी लघुपाटबंधारे योजना मृद व जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा विषय बैठकीत मांडण्यात आला. आवश्यक अहवाल व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून विशेष बाब म्हणून प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याबाबत चर्चा झाली.

विषय क्रमांक ४ : कवळा पाझर तलाव क्रमांक २
कवळा पाझर तलाव क्रमांक २ संदर्भातील प्रलंबित विषयावरही बैठकीत चर्चा झाली. संबंधित विभागाशी समन्वय साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

विषय क्रमांक ५ : सातगाव मसला, सवना व वैरागड येथे पूर संरक्षक भिंती
चिखली तालुक्यातील सातगाव मसला, सवना व वैरागड या गावांमध्ये नदीकाठावर पूर संरक्षक भिंती उभारण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या प्रस्तावावरील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती देण्याबाबत विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याने चिखली विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा, सिंचन व पूर संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या विकासकामांना लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अनुसरून मतदारसंघातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडणाऱ्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पांना सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button