बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण; आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारातून शेतरस्त्यांची क्रांती

९१ किलोमीटर लांबीच्या ७१ शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा; विकासाला मिळाली नवी गती

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस चिखली तालुका प्रतिनिधी अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज, दि. २२ जुलै २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ किलोमीटर लांबीच्या ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांची अडचण दूर होऊन शेती उत्पादनाची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच धर्तीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात शेतरस्त्यांचे जाळे उभारण्यावर विशेष भर दिला आहे. शेतापर्यंत पोहोचणारे रस्ते हे केवळ विकासाचे साधन नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया आहेत, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली असून त्याचेच हे मूर्त स्वरूप मानले जात आहे.

या लोकार्पण कार्यक्रमांतर्गत उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्री अंकुशराव पडघान पाटील, अमडापूर–ईसोली जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्री एकनाथराव जाधव व श्री संजय गाडेकर, तसेच धाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्री तेजराव नरवाडे, श्री योगेश राजपूत आणि श्री विशाल विसपुते यांच्या हस्ते विविध शेतरस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button