महाराष्ट्रविदर्भसामाजिक

मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तेल्हारा तालुका व शहर याच्या वतीने…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि. ०९ ; तेल्हारा शहरामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

   हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा  शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांचा आज  जन्मदिवस असुन त्यांचा हा जन्मदिवस सर्वत्र  साजरा करण्यात येत आहे . 
त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  शिवसेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव यांच्या नेतृत्वात श्री लटीयाल भवानी माता मंदिर येथे महादेवाच्या पिंडीचा दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली, तसेच टावर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक व पुजन करण्यात आले , नंतर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले 

यावेळी तेल्हारा तालुका शहर येथील पदाधिकारी, तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव, शहर प्रमुख अनिकेत ढवळे निवासी उपतालुका प्रमुख पिंटू पाटील फोकमारे ,भास्कर कोरडे, रमेश भुजबले, प्रकाश चिकटे आदित्य अग्रवाल , विक्की वाघ, विजय पवार, प्रकाश वानखेडे , दीनेश विखे , निखील हिवराळे , प्रशांत गावत्रे , ऋषभ ठाकूर , शिवराम गिरी , शुभम खंडारे , सत्यम फोकमारे , पंकज वाडेकर, सक्षम तेलगोटे, रघुनाथ विखे, गोपाल आमले, संतोष गिऱ्हे, नंदु चिकटे ,
यांच्यासह तेल्हारा तालुका व शहर शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिकांची मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button