तरुणांची दिशाभूल !

तरुणांची दिशाभूल !
शाळेत मुले जातात.इतिहास भुगोल नागरिक शास्त्र शिकतात.पुस्तकात वाचलेले आणि मास्तरांनी शिकवले ते बाळबोध असते.ते शिकून मुलांना वाटते की,आपला कलेक्टर खूप प्रामाणिक असेल.आमदार मंत्री देशभक्त असतील . प्रत्यक्षात तसे नसते.समाज कल्याण अधिकारी तर खूप वाईट माणूस किंवा महिला सुद्धा!जेंव्हा हिच मुले साधा जातीचा दाखला घेण्यासाठी जातात तेंव्हा हेच अधिकारी फटफजिती करतात.चकरा मारायला लावतात.हे कसले समाज कल्याण अधिकारी?हे तर समाज सत्यानाश अधिकारी आहेत.जर कोणाचा अर्ज दाखल झाला तर त्याच्या समोरच छानणी करून कमी अधिक कागदपत्रे मागितले पाहिजे.पुरावे बरोबर असतील तर येथेच दाखला दिला पाहिजे.पण तसे करीतच नाहीत.फालतू बसून गप्पा मारतील पण फाईल पाहात नाहीत.कधी कधी तर अर्ज दाखल करायला आढेवेढे घेतात. तुम्ही कलेक्टर कडे गेलात तर कलेक्टर अर्ज ठेवून घेतो.पण करीत काहीच नाही.कधीच म्हणत नाही,का रे,समाज कल्याण अधिकारी, या मुलांची जात खोटी आहे का?खोटी असेल तर तसे लिहून उत्तर दे.खरी असेल तर तसा दाखला दे.जर खरे खोटे कळत नसेल तर नोकरी सोड.मी तर म्हणतो तसे.असे अज्ञानी, कामचोर, नालायक नोकर का ठेवायचे? अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीसाठी अर्ज करीत असतील तर! तरूणांनो,साधा सातबारा नोंद करणे, सातबारा मिळवणे,ड पत्रक मिळवणे साठी खूप उपद्व्याप करावे लागतात.राशनकार्ड आधीच असेल तरीही नवे बनवण्यासाठी खूप पाप करावे लागते.पोलिस,आरटीओ तर वेगळीच दुकाने आहेत.बांधकाम , जलसंपदा चा अनुभव घेतला तर कळेल की,विकास होत आहे की भकास? मुख्यमंत्री चे नांव आपल्या शाळेतील फळ्यावर लिहीलेले असते.शिक्षणाधिकारी आला की,विचारतो,सांगा,आपले मुख्यमंत्री चे नांव.मुले पटकन सांगतात.शाबासकी मिळवतात.पण हे माहीत नसते की, मुख्यमंत्री काय काय पाप करतो,किती किती भ्रष्टाचार करतो?जर कळले तर तुम्ही फळ्याला डांबर फासणार.ठाकरे,शिंदे , पवार, फडणवीस यांचे आजच्या कामकाज वर सिनेमा काढला तर तरूण क्रांतीवीर बनतील.नाना पाटेकर सारखा. तरूणांनो,गुरूजीना, सरांना, प्रोफेसरांना, कुलगुरूंना कधीतरी विचारा,या आमदारांनी, मंत्र्यांनी इतकी संपत्ती कशी वाढवली?ते आम्हाला शिकवा.बाकीचे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र,गणित विज्ञान आम्ही पुस्तकातून वाचून घेऊ.हे गुरू ते कुलगुरू झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करतील. बेघर लोकांना घरकुल मिळवताना किती भानगडी,लफडी करावी लागतात,यांचा अनुभव घ्या कधीतरी.तुमचा सरपंच, ग्रामसेवक,बीडीओ,सीईओ काय गुल खाऊ घालतात.एकदा धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे जाऊन या.एकदा जामनेर तालुक्यातील शहापूर येथे जाऊन या.दोन्ही ठिकाणचे आमदार मंत्री असूनही, भयंकर तमाशा झाला आहे.अजिंठा, वेरूळ, पद्मालय ऐवजी आता ही पापालये पाहण्यासाठी शाळेची सहल काढली पाहिजे. भारताचा राष्ट्रीय ध्वज वर्षातून दोनदा फडकावला जातो.फडकावणारा तो पालकमंत्री काय काय पाप करून गब्बर होतो,ते पाहून शोलेचा गब्बर सिंग सुद्धा लाजेल.तो सुद्धा रामगड सोडुन राजकारण करायला लागेल. माझा उद्देश आहे,तरूणांना आजचे समाजकारण, राजकारण, शासन,प्रशासन, अर्थकारण, भ्रष्टाचाराचे ज्ञान देणे आवश्यक झाले आहे.जे मला शाळेत, हायस्कूल मधे, कॉलेजमध्ये मिळालेच नाही.ते कळायला मला पन्नास वर्षे लागलीत.तसे तुमचे होऊ नये.तुमची दिशाभूल होऊ नये.कारण तुम्हाला पुढे याच चोरांशी पंगा घ्यावा लागणार आहे….
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव



