अनिल देशमुख तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेगावच्या वतीने अनिल देशमुख यांना पाठिंबाची हाक देण्यात आली*

*अनिल देशमुख तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेगावच्या वतीने अनिल देशमुख यांना पाठिंबाची हाक देण्यात आली* *शेगाव* – बुधवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर शेगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ढोल ताशे वाजून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जल्लोष करण्यात आला.गेल्या 14 महिन्याची शिक्षा भोगून ते काल कारागृहातून बाहेर पडले. त्यांच्यावर शंभर कोटीची खंडणीचा आरोप असता त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली होती. तरी मंगळवारी सुनावणी असताना न्यायालयाने ती सुनावणी फेटाळून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गगनात मावेना त्याकरिता काल शेगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ढोल ताशे वाजून अनिल देशमुख तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आल्या.राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश साळुंखे, शैलेश पटोकार,गणेश पिसे, चेतन फुंडकर, भूषण दाभाडे, गजानन हुसे, अहमद खान, संतोष शेगोकार, रवींद्र भिरडे, राजू काठोळे, जिया भाई, श्रीधर गायकवाड सागर पाऊल झगडे, बाळू तायडे, विजय पहुरकर, सागर डांबरे, गजानन भोंडेकर इत्यादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे



