खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील कमलाकर कापसे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील रहिवासी कमलाकर सदाशिव कापसे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून वाणिज्य व व्यवस्थापन विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

कमलाकर कापसे यांनी “A Study of Financial Performance of SBI and HDFC Bank during Pre & Post COVID-19 Pandemic” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण करून विद्यापीठात संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या संशोधन कार्याला धुळे येथील एम. डी. पालेषा वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रभाकर सखाराम महाले यांचे मार्गदर्शन लाभले.

पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य प्रा. प्रभाकर महाले यांनी त्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कमलाकर कापसे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार 4 पुस्तकांचे लेखन तसेच 23 पुस्तकांचे सहलेखन केले आहे. त्यांच्या 10 संशोधन लेखांचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशन झाले आहे.

याशिवाय, “Financial Fraud Detecting Computer Device” या अभिनव संगणकीय उपकरणाच्या डिझाइनची नोंदणी यूके इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK Intellectual Property Office) कडून करण्यात आली असून त्यांना यासाठी यूके डिझाइन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

ते तरोडे येथील सदाशिव लक्ष्मण पाटील यांचे सुपुत्र असून सध्या बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध महाविद्यालयांतील विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button