आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र, सवणा येथे योगसाधना उपक्रम उत्साहात; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:-सलमान पठाण
दि,२१/०६/२०२६
सवणा,ता.चिखली,
आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त
आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र, सवणा यांच्या वतीने आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत योगसाधना व प्राणायाम उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात गावातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. निरोगी व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन श्रद्धा पाटील (समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी केले. यावेळी अनंता अवचार (आरोग्य सेवक), सविता डोंगे (आरोग्य सेविका), आशा सेविका तसेच अर्धवेळ परिचर पुष्पा गवई यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
आरोग्याविषयी जनजागृती करून निरोगी गाव घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे,योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग आहे.
नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात काही वेळ योगासाठी द्यावा, यामुळे जीवन अधिक आनंदी आणि निरोगी बनते.



