देऊळगाव राजा छत्रपती शिवाजी महाराज न. प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथेआंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :–शंकर शिवरकर
देऊळगाव राजा, दि. 21 जून : नगरपरिषद मुख्याधिकारी अरुणजी मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर परिषद देऊळगाव राजा यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सामूहिक योग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनमूल्ये समाजात रुजविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाला आज जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून,
योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून एक संपूर्ण जीवनपद्धती बनला आहे
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, व महिला, आणि ,नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायाम करण्यात आले.
योग ही निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली असून
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी
योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे
आरोग्यासाठी योगाचे असलेले महत्त्व पटवून देण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
आयोजनासाठी नगर परिषद प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमातून दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“करू योग… राहू निरोग!” या संदेशासह आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
योग करा निरोगी रहा आनंदी राहा!



