मुक्ताईनगर भेटीत पालकमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा प्रतिनिधी | मुक्ताईनगर (सुरेश भाऊ)




मुक्ताईनगर भेटीत पालकमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा प्रतिनिधी | मुक्ताईनगर (सुरेश भाऊ)राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे शेगावकडून पाळधीकडे परत जात असताना मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आमदार पाटील यांच्याशी मतदारसंघांमध्ये होणाऱ्या कामांचा आढावा घेत सविस्तर चर्चा केली. तसेच दूध संघाच्या निवडणुकीबाबतही चर्चा केली.भेटी दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. सोबत पदाधिकारी, कार्यकर्ते.बोलताना चर्चा केली. लवकरच ही कामे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकत्यांना बाळासाहेबांच्या विचारांनुसार शिवसेनेचे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. एवढेच नव्हे तर मुक्ताईनगर आणि जामनेर येथील रा एमआयडीसींच्या निर्मितीच्या संदर्भातही पदाधिकाऱ्यांचीकरेयाप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक राजू हिवराळे, गोपाळ सोनवणे, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे संघटक अफसर खान, युवा सेनेचे पंकज राणे, नगरसेवक पीयूष महाजन,नीलेश शिरसाठ, प्रशांत पाटील, शुभम शर्मा, रितेश सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यापूर्वी मुंबईत उद्योगमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत येथील एमआयडीसी मागणीसंदर्भात तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यामुळे आता यासंदर्भात काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.



