भारत जोडो यात्रेसाठी गावागावांत बैठका नियोजन

पाचोरा प्रतिनिधी

अॅड. संदीप पाटील यांच्याकडे समन्वयाची जबाबदारीलोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. शेगांव येथील सभेसाठी जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत. यासाठी गावागावांतून बैठका घेतल्या जात आहेत. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.तालुक्यातील जिल्हा परिषद गटात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा व शेगाव येथील सभेची माहिती दिली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत असल्याचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी सांगितले.गावोगावी बैठकाशेगाव येथील सभेची जनतेत मोठी उत्सुकता आहे. सभेसाठी दोन हजार कार्यकर्ते जाणार असून, याबाबत गावपातळीवर बैठका घेतल्या जातपाचोरा येथे नियोनासाठी बैठकपाचोरा: भारत जोडो यात्रा आणि शेगाव येथील सभा यात पाचोरा शहर व तालुक्यातून कॉंग्रेस पदाधिकारी सहभागी होणार आहेत. याबाबत नियोजनासाठी पाचोरा विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार होते. भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक अॅड. संदीप पाटील उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस जमील शेख, सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस अजबराव पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माइल शेख फकिरा आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, अमजद पठाण यांनी भारत जोडो यात्रेचे महत्त्व समजून सांगितले. शेगाव येथील सभेला पाचोरा भडगाव तालुक्यातून पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शहर आणि ग्रामीण भागात मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.भडगावातून ५ हजार कार्यकर्ते जाणारभडगाव तालुक्यातून शेगाव येथील सभेत ५ हजार कार्यकर्ते जाणार आहेत. सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, तालुकाध्यक्ष रतिलाल महाजन, प्रदीप पाटील, दिलीप शेंडे, याकूब पठाण, कमर अली, मोरसिंग राठोड, हरुण पटेल, अतुल पाटील, भूषण पाटील, प्रकाश सोनवणे, साजन पटेल, विजय पाटील, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष पोपटराव मोरे आदी उपस्थित होते.आहे, असे तालुका अध्यक्षपदाचे दुसरेदावेदार शरद पाटील यांनी सांगितले.




