मुक्ताईनगर बस स्थानकात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी शाळकरी मुलींमध्ये भीतीचे वातावरण

मुक्ताईनगर बस स्थानकात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी शाळकरी मुलींमध्ये भीतीचे वातावरण
:-(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर मध्ये प्राथमिक शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यार्जनासाठी येत असतात तसेच संत मुक्ताई मंदिरामुळे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी सुद्धा मुक्ताईनगर मध्ये असंख्य भाविकांची कायम वर्दळ असते त्यामुळे मुक्ताईनगर बस स्थानक परिसर तसेच मुक्ताईनगर मधील मुख्य चौक म्हणजेच प्रवर्तन चौक ज्या ठिकाणाहून जळगाव धुळा नाशिक मुंबई तसेच मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर इंदोर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची कायम वर्दळ असतेच त्यातच शाळा महाविद्यालयांची सुट्टी झाल्यानंतर त्यात विद्यार्थ्यांची सुद्धा भर पडत असते त्यामुळे प्रवर्तन चौक आणि बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते या गर्दीचा फायदा घेत बस मध्ये बसताना किंवा चढताना महिलांचे मंगळसूत्र किंवा दागिने पर्स आणि पुरुषांचे पाकीट चोरीला जाण्याच्या तसेच खिसा कापण्याच्या एक ना अनेक घटना समोर आलेल्या आहेत त्यातच बस स्थानकामध्ये टवाळखोर मुलांचा देखील वावर वाढलेला आहे त्यामुळे अनेक वेळेस बस स्थानकामध्ये हाणामारीच्या घटना नित्याचेच झालेले आहे आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हाणामारीच्या घटना घडत असतात आज दिनांक 12 बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान अशीच विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली त्यामुळे खेड्यापाड्यावरून येणाऱ्या लहान लहान शाळकरी मुलींमध्ये घबराटीचे वातावरण दिसून आले लागलीच पोलिसांना सुज्ञ नागरिकांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर पोलीस प्रशासनाची गाडी बस स्थानक परिसरात येईल त्या आधीच हाणामारी करणारे विद्यार्थी बस स्थानक परिसरातून पसार झालेले होते बस स्थानकातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही याबाबत पोलीस प्रशासनाला पत्र दिले आहे की किमान शाळा भरण्याच्या वेळेस आणि शाळा सुटण्याच्या वेळेवर दोन-तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती द्यावी परंतु ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पोलीस प्रशासनाचे कर्मचारी कुठे होते ? अशा घटनांवर आळा बसेल का ? जर एखाद्या विद्यार्थ्यांचे काही बरे वाईट झाले झाले तर याला जबाबदार कोण ? असा सवाल प्रवाशांमधून तसेच नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे



