मुक्ताईनगर मतदारसंघासाठी २५ कोटींचा निधी मंजूर१३ प्रमुख रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यशमुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मतदारसंघातील १३ प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.दि

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मतदारसंघातील १३ प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.दि
. ६ मार्च २०२६ रोजी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर व्हावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळावी यासाठी आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून अनेक गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांची सुधारणा, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या निधीसाठी आमदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. मतदारसंघातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने या प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या निधीतून रावेर–पातोडी–पिंपरी–डोलारखेडा मार्गासह विविध राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांवरील रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच पूर्णाड–खामखेडा–मुक्ताईनगर–रुईखेडा मार्गाचे मजबुतीकरण, आमदगाव–नाडगाव–कोल्हाडी–शिरसाळे मार्गाचे डांबरीकरण, किन्ही–खंडाळा–मोंढाळा मार्गाची सुधारणा तसेच चांगदेव–मानपूर–मानेगाव–कोथळी मार्गावर लहान पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामांमुळे मतदारसंघातील अनेक गावांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. आता २५ कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे मार्गी लागणार असल्याने मतदारसंघात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक व कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
दरम्यान, “मतदारसंघातील जनतेला दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता असून महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,” असे आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी सांगितले.



