बुलढाणाविदर्भ

“अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा चिखलीत महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

चिखली (प्रतिनिधी )

आरुना दत्तात्रय खंडागळे

महिलांमध्ये अफाट क्षमता फक्त कुटुंबाचे पाठबळ आवश्यक… आ. सौ. श्वेता महाले.

तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे आयोजित “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), मेरा युवा भारत, बुलढाणा जिल्हा क्रीडा कार्यालय आणि ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मुली व महिला खेळाडूंशी संवाद साधताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचे विशेष स्मरण केले.” भारतीय महिलांमध्ये अफाट क्षमता आहे. हे सारे यश रातोरात मिळालेले नाही त्यामागे वर्षानुवर्षांची साधना, त्याग आणि अतूट विश्वास आहे,” असे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी अत्यंत प्रेरणादायी शब्दांत सांगितले.

आमदार सौ.श्वेता महाले पाटील पुढे म्हणाल्या, “कुटुंबाचे पाठबळ आणि स्वतःवरील अढळ विश्वास यामुळे मुली कुठलेही आव्हान स्वीकारण्यास तयार होतात,त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलींच्या खेळाला प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या स्वप्नांना घराबाहेरही उडण्याची संधी द्यावी. “एक पदक केवळ एका मुलीचे नसते तर,ते संपूर्ण तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि देशाचे असते,” असे सांगत त्यांनी खेळाडूंमध्ये नवा उत्साह संचारला.

उपस्थिती व समारोप
कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी, ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, मेरा युवा भारतचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button