जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुका निमखेडी खुर्द येथे भीषण नाग शेतकऱ्याचा लाखोचा मला जाळून खाक अतोनात नुकसान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका तरुण शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत पवन दामोदर चिखलकर यांच्या शेतातील शेणखत, पीक व पशू मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले असून, परिसरात भयाक्रांत वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळील शेतामध्ये डीपीजवळ शेणखत साठवले होते. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडल्याने शेणखताला आग लागली आणि काही क्षणांत आग प्रचंड स्वरूप धारण केली. या आगीत पवन दामोदर चिखलकर यांचे दहा बकऱ्या तसेच चार ते पाच बकऱ्यांची पिल्ले जळून मरण पावली. तसेच गहू, ज्वारी यासह शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन साहित्य व इतर महत्त्वाचे शेती साहित्यही जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच बोदवड येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यासाठी तातडीने काम सुरू केले. पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी घरोघरी पाणी उभारून या आगीवर नियंत्रण मिळवले.ग्रामस्थांनी शेतकऱ्याच्या मोठ्या आर्थिक नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली असून, नुकसान पंचनाम्याद्वारे तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेत मदतीसाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button