क्राईमजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरात पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ शेतकऱ्याची 60 हजारांची फसवणूक

मुक्ताईनगर- प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल 60 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात चिंता निर्माण झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रघुनाथ बोठे (वय 69, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) हे दि. 17 मे 2026 रोजी बाजार करून मोटारसायकलने घरी परतत होते. त्या वेळी सालबर्डी गावाजवळ योगायोग हॉटेल परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून चौकशी सुरू असल्याचे भासवले.

दरम्यान, संशय निर्माण करून आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील एक 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दुसरी 4 ग्रॅम वजनाची पुष्पराज खडा असलेली सोन्याची अंगठी, एकूण 60 हजार रुपये किमतीच्या वस्तू घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे फिर्यादी मोठ्या मानसिक त्रासात आहेत आणि त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवली.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0214/2026 अंतर्गत BNS कलम 204 व 318(4) प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. राजेश चव्हाण करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button