खानदेशजळगावा जिल्हासामाजिक

मुक्ताईनगर : आदिवासी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी बेमुदत उपोषण

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) –
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी प्रवर्तन चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

अमरण उपोषण संजय परलाद कांडेलकर

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू केलेल्या या आंदोलनातून समाजाचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कांडेलकर यांनी समाजबांधव व महिला भगिनींना आवाहन केले की, “या उपोषणाला जास्तीत जास्त पाठिंबा द्या, मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि शासन-प्रशासनावर दबाव निर्माण करून आपले न्यायहक्क मिळवा.”

यापूर्वीही संजय कांडेलकर यांनी तब्बल २६ दिवस अन्नत्याग उपोषण करून समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या या जिद्दी व लढाऊ वृत्तीमुळे आदिवासी कोळी समाजात त्यांचा अभिमानाने उल्लेख केला जातो.

सभोवताली घोषणाबाजीसह “आदिवासी कोळी समाजाचा विजय असो!” या हाकांनी परिसर दुमदुमला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button