4 , 65 ,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त : तीन आरोपी पोलिसाच्या जाळ्यात भुसावळ बाजार पेठ पोलिसांची कामगिरी

4 , 65 ,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त : तीन आरोपी पोलिसाच्या जाळ्यात :
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत तील दुचाकी हिरो होंडा कंपनीची पेंशन प्रो मोटार सायकल क्रमाक एम.एच.19 डि.एन. 4704 काळ्या रंगाची मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार नोदण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे तपास पोहे कॉ विजय नेरकर हे करीत असतांना गुप्त माहिच्या अनुशंगाने संशईत आरोपी शेख बासीद शेख बाबु वय 28 राहणार सुलतानरपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम मोहम्मदी नगर भुसावळ, मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज वय 25 राहणार सुलतानपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा,रविंद्र अंबादास घोडसे वय 48 वर्ष राहणार पळसोडा तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाना सोनाळा यांना सदर गुन्ह्याचे अनुशंगाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासा दरम्यान सदरचे तिन्ही आरोपीतांनी भुसावळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा, बुऱ्हाणपुर (एम.पी), येथुन ईतर मोटर सायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिल्याने तपासादरम्याने एकूण 4,65,000/- रुपये किमतीच्या हिरो होन्डा, हिरो, बजाज कंपनीच्या एकुण 12 मोटर सायकली आरोपीतांकडून विविध ठिकाणावरुन जप्त करण्यात आले आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ भाग,भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.चे मा. पो.निरीक्षक गजानन पडघन, पो.उपनि. मंगेश जाधव, पो.हवा विजय नेरकर, पोहेकॉ यासीन पिंजीर, पोहेकों महेश चौधरी, पोहेकॉ समाधान पाटील, पोहेकों/2816 निलेश चौधरी, पोहेकॉ रमन सुरळकर, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना दिनेश कापडणे, वरिष्ट पोकों सचिन चौधरी, पोकों राहुल वानखेडे, पोकॉ भुषण चौधरी, पोकों जावेद शाह, पोकों प्रशांत सोनार, पोकॉ योगेश महाजन, प्रशांत परदेशी, पोकॉ योगेश माळी, पोको अमर अढाळे, अशांनी कायदेशीर कार्यवाही केलेली आहे.



