मालेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा

आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता मालेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आज ता. १५ ऑक्टोंबर रोजी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात असंख्य ट्रॅक्टर सह शेकडोंच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. जुने बसस्थानकावरून भव्य मोर्चाला सुरुवात झाली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता १५ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे सर्व विषय असल्यामुळे मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला… असंख्य ट्रॅक्टर सह शेकडोंच्या संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. येथील जुने बसस्थानकाच्या हनुमान मंदिरापासून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात होऊन जोगदंड हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, शिव चौक, लहुजी पुतळा, नविन पंचायत समितीच्या समोररून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला… या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते… या ठिकाणी आमदार अमित झनक यांच्यासह इतर नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाशीम जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, सोयाबीन हमी भाव द्यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, वीज समस्या दूर करावी, शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर व ठिंबकचे अनुदान जमा करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली..
यावेळी आमदार तथा जिल्हा कॉग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष अमित झनक, कॉग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष संदिप घुगे, उबाठाचे तालुका प्रमुख उध्दव घोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तालुकाध्यक्ष भगवानराव शिंदे यांच्यासह मोर्चात असंख्य ट्रॅक्टर व शेकडोंच्या संख्येने शेतकरी व काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते… ठाणेदार संजय चौधरी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.



