शेतकरयांने गळफास घेवून आत्महत्या जलंब

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव
माटरगाव परिसरातील घटना 40 वर्षीय शेतमजुराने शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 6 जानेवारी रोजी दुपारी माटरगाव शिवारात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात – सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलंब – पो.स्टे. अंतर्गत जवळच असलेल्या माटरगाव ता शेगाव येथील रहिवाशी – शेतमजूर प्रकाश नारायण मोरे वय 40 वर्ष या इसमाने माटरगाव शिवारात – असलेल्या जितेंद्र राठी यांच्या शेताच्या धु-यावर असलेल्या लिंबाच्या झाडाला – दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती – समजतात जलंब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत – शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. सदर – इसमाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबतची फिर्याद रमेश समाधान मोरे रा. माटरगाव यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून – पोलिसांनी मर्ग नं 01/2024174 जाफौनुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्याम – पवार, पोका सचिन बावने हे करित आहेत.



