२३ मार्च पासून होणार ” वैराट ” सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात , चित्रपट अल्पावधीतच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी-
दि. २१ : – ‘गुल्हेर’ आणि ‘गुल्हेर-2’ या मुख्य दोन चित्रपटाच्या यशानंतर आता स्वराज्य फिल्म प्रोडक्शन (एल एल पी ) पुणे आणि ताज एंटरटेनमेंट हे आगामी काळात आपल्या भेटीला एक आगळावेगळा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत . दिग्दर्शक गिरी एस राज यांच्या म्हणण्यानुसार ” वैराट ” असे या नव्या चित्रपटाचे नाव असुन लवकरच येत्या शनिवारी म्हणजेच 23 मार्च रोजी वैराट या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून अल्पावधीतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
” वैराट ” असे या सिनेमाचं नाव ऐकल्यावर हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ” सैराट ” या चित्रपटा सारखा असेल किंवा त्याहुन वेगळा असेल , अशी शंका यावेळी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच निर्माण होईल परंतु दिग्दर्शक गिरी.एस.राज आणि जाहीर एस.पटेल यांनी खूप आगळ्या-वेगळ्या असलेल्या ” वैराट ” या चित्रपटाची निर्मिती करण्याचे योजिले आहे त्यामुळे या चित्रपटात खूप वेगळं काही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. म्हणुन सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले असुन
हि संपूर्ण माहिती दिग्दर्शक गिरी एस राज यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली.



