महिलांना पैसे नको सुरक्षित वातावरण द्या – रोहिणी खडसे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी रणधीर पवार
जुन्नर- राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खा.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू करण्यात आली आहे
आज किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांना वंदन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर
यात्रेची पहिली सभा जुन्नरच्या लेण्याद्रीत पार पडली यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी
महिलांना पैसे नकोत पण महिलांना नेमकं काय हवंय? याबाबत आताचं सरकार अज्ञानी असल्याचे सांगत


लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली यावेळी त्या म्हणाल्या लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळं ह्यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच. ह्यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे’ पण महिलांना सुरक्षा हवी आहे ज्या महिलांनावर अत्याचार झाले त्यांना अजून न्याय मिळालेला नाही त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत



या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांसारखे राजे होऊन गेले ज्यांनी महिलांनावर अत्याचार करणाऱ्याचे हात छाटले परंतु आज या देशात मणिपूर ,उरण, शिळ फाटा सारख्या महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत ज्यामुळे सर्वांची मान शरमेने खाली जाते आहे परंतु हे सरकार महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत संवेदनशील नाही
असं म्हणत रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले
यावेळी माजी गृहमंत्री आ अनिल देशमुख, आ.अशोक पवार, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते



