बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भ

मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी बोर्डात डॉ.गैरहजर अपंग जनता दल संघटनेच्या तक्रारीनंतर त्याच दिवशी जिल्हा शल्यचिकित्सकांचे पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल अधिक्षक डॉ. उंबरकर यांना खडसावले

मलकापूर:- दर बुधवारी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी बोर्ड असतो. या बोर्डात नेत्ररोग, अस्थिरोग आणि फिजिशियन तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणे बंधनकारक असते.

मात्र दि.15 ऑक्टोबर 26 बुधवारी रोजी बोर्डाच्या दिवशी एकही डॉक्टर हजर न राहिल्याने सकाळपासून आलेले अनेक दिव्यांग बांधव ताटकळत बसून राहिले. त्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. रुग्णालय प्रशासनाने डॉक्टर येणार नसल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच अपंग जनता दल सामाजिक संघटनचे राज्य सचिव कलीम शेख यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार बुलढाणा यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली व तक्रार दाखल केली.

तक्रारीची तात्काळ दखल घेत दिव्यांग प्रती आदर व सन्मान बाळगणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वतः हजर झाले. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंबरकर व संबंधित स्टाफला चांगलेच खडसावले व जाब विचारला.

“दिव्यांग बांधव लांबून येतात. जर डॉक्टर येणार नसतील तर किमान एक दिवस आधी व्हाट्सअप ग्रुपवर किंवा सूचना फलकाद्वारे कळवावे. यापुढे दिव्यांग बांधवांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी स्पष्ट आदेश दिले.

कलीम शेख यांनी पत्रकारांना दिलेल्या सूचनेनुसार उपस्थित असलेले पत्रकार तथा शिवसेना (उ बा ठा) पक्षाचे बुलढाणा उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, लोकमतचे हनुमान जगताप, देशोन्नतीचे अनिल कुमार गोठी यांनीही जिल्हा वैद्यकीय अधिकारी बिराजदार दत्तात्रेय यांच्यासमोर उपजिल्हा रुग्णालयातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा मांडला.
शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत, काही डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्यामुळे त्यांच्या शासकीय कर्तव्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. रुग्णालयात गंभीर अथवा अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर डॉक्टरांना संपर्क साधावा लागतो. त्यानंतरही रुग्णाला आवश्यक उपचार मिळण्याऐवजी त्याला दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
जर गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होत नसतील आणि त्यांना तातडीने दुसरीकडे हलविण्याची वेळ येत असेल, तर शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा उपयोग काय, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button