बुलढाणामलकापूर

मलकापूरमध्ये महाविकास आघाडीची गर्जना – आ. राजेश पंडितराव एकडे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या सभेची जोरदार तयारी

मलकापूर – मलकापूर विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. राजेश पंडितराव एकडे यांच्या समर्थनार्थ १२ नोव्हेंबर रोजी एक भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व व माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे या सभेस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता, नूतन विद्यालय मलकापूर येथे होणाऱ्या या सभेसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी मोठ्या उत्साहात तयारी करत आहेत. मतदारसंघातील सर्व समर्थकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून आ. राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखालील विकास दृष्टिकोनाचा लाभ घेता येईल. महाविकास आघाडीने या सभेला मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button