मच्छिंद्रखेड येथे आज जानाई मातेची यात्राजलंब दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येथून नजीकच असलेल्या मच्छिंद्रखेड

मच्छिंद्रखेड येथे आज जानाई मातेची यात्राजलंब दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येथून नजीकच असलेल्या मच्छिंद्रखेड ता. शेगाव येथे आज गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य जानाई मातेची यात्रा भरते. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कार्यकाळात शासनाच्या वतीने यात्रेवर बंदी घालण्यात आली होती त्यामुळे यात्रा महोत्सव स्थगित करण्यात आला होता परंतु आता कोरोना काळ संपल्यामुळे यावर्षी शेगाव तालुक्यातील मच्छिंद्रखेड येथे गुढीपाडव्याच्या दिवशी येथील जानाई माता मंदिर परिसरामध्ये संस्थांन वतीने भव्य जानाई माता यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील जानाई माता ( आसरा) मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये माता भगिनी या जानाई मातेला कबूल केलेला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठीयेत असतात. तसेच जानाई माता संस्थांच्या परिसरातील शेतामध्ये भक्तांच्या वतीने भंडाऱ्याचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात तसेच जानाई। मातेच्या यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची ठीक ठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने व मंदिर संस्थांनच्या वतीने भाविक भक्तांना सुविधा पुरवल्या जातात. येथील जानाई माता यात्रा महोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख राहणार आहे. (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)



