बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मंगरूळ नवघरे येथिल जि .प . हायस्कूलचा भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेत समावेशजिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून निवड झालेली मंगरूळची एकमेव शाळा

:- स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
:- प्रतिनिधी प्रशांत चव्हाण

मंगरूळ नवघरे : चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ नवघरे या शाळेची भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक : आदर्श २०२६ / प्र.क्र. २२ /
एसडी – ६ / दिनांक २७ मार्च २०२६ रोजी शासनाकडून निवड करण्यात आली आहे असे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे .
याबाबत सविस्तर असे की , विकसित महाराष्ट्र – २०४७ व्हिजन डाक्युमेंटमध्ये निश्चित करण्यात आलेल्या पाच धोरणात्मक स्तंभांपैकी प्रथम स्तंभामध्ये राज्यातील शाळांचे प्राथम्याने सक्षमीकरण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत भौतीक सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे म्हणून शासनाने विकसित महाराष्ट्र -२०४७ व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट अल्पकालीन ध्येय २०२५ ते २०२९ नुसार राज्यातील आदर्श शाळा योजनेमध्ये समूहसाधन केंद्रशाळा , पीएमश्री शाळा व विद्यानिकेतन शाळा यांचा अंतर्भाव करून अशा शाळांमध्ये पायाभूत भौतीक सुविधांचा विकास करणे हे ध्येय साध्य करण्याकरीता आदर्श शाळा विकसित करणे आवश्यक आहे असे धोरण ठरविण्यात आले .
त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राज्यातील शासकिय / जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४०५ शाळा विकसित करण्यास मंजूरी दिली आहे . या अंतर्गत निवडलेल्या शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अत्याधुनिक व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देता यावे या मुख्य उद्देशाने अशा शाळांमध्ये भव्य इमारतीसह डिजिटल क्लासरुम्स / सुसज्ज वाचनालय / आधुनिक प्रयोगशाळा / कॉम्प्युटर लॅब / सांस्कृतिक सभागृह / पिण्यासाठी आर . ओ फिल्टर पाणी / स्वच्छ व सुसज्ज शौचालये / वीज जोडणी व इंटरनेट वापर आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .
एकंदरीत राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत
स्मार्ट स्कूल – स्मार्ट टिचर – स्मार्ट स्टूडेंट – स्मार्ट एज्युकेशन ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबविण्यासाठी या शाळांना
” भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा “
म्हणून विकसित करण्यास राज्य शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे .
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक विभागातून १२ आणि माध्यमिक विभागातून १ अशा एकूण १३ शाळांची निवड करण्यात आली असून जिल्हयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून मंगरूळ नवघरे येथिल जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ह्या एकमेव शाळेची निवड करण्यात आली आहे त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना लागणाऱ्या भौतीक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून डिजिटल आणि आधुनिक शिक्षाणाची संधी मिळणार आहे त्यामुळे शैक्षणिक वातावरणात मोठी सकारात्मक सुधारणा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे असे मत प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांनी व्यक्त केले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button