बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पुण्यावरून अकोटला जाणाऱ्या कारचा चिखली खामगाव रोडवर हिवरखेड फाट्याजवळ अपघात,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण

चिखली – दिनांक ५/०४/२६ रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास पुण्यावरून अकोटला जाणाऱ्या स्कोडा (MH14 MV 9827 ) या गाडीला हिवरखेड फाट्याजवळ भयानक असा अपघात झाला , हा अपघात इतका भयंकर होता की गाडी अंदाजे 150 ते 200 मीटर पलटी घेत रोडच्या बाजूच्या नाली मध्ये पडली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले . गाडीचे इंजन तुटून रोडच्या एका बाजूस पडलेले आढळले , गाडीमध्ये प्रवासी दोघे पती-पत्नी होते, ते गाडीमध्ये असतानाच गाडीने पेट घेतला. मात्र त्यावेळेला चिखली येथील रहिवासी. श्री .प्रदीप वाळेकर व श्री .प्रकाश दिघेकर हे अकोला येथून चिखलीला येत असताना त्यांनी हा अपघात बघितला. आणि आणि तात्काळ त्या दोघा पती-पत्नींना त्यांनी पेटलेल्या गाडीतून सुखरूप बाहेर काढले.
आणि त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले . वेळेत उपचार झाल्याने दोघांचेही प्राण वाचले , मात्र या अपघाता मध्ये गाडीचे शंभर टक्के नुकसान झाले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button