
*भोनगाव फाटा ते भोनगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे ।* स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवाशेगाव (प्रतिनिधी)मिलिंद चराटे
शेगाव तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या भोनगाव फाटा ते भोनगाव रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून खड्डेच खड्डे पडत आहेत हा रस्ता खड्ड्यामध्ये आहे की खड्डे रस्त्यात आहेत हेच वाहनचालकांना समजत नाही भोनगाव फाट्यावरून भोनगाव सगोळा चिचखेड कडे जाण्यासाठी अनेक प्रवासी व शेकडो विद्यार्थी या रस्त्याने ये जा करतात भोनगाव फाटा पासून तर पहुरपूर्णा गावापर्यंत हा रस्ता एवढा खराब झालेला आहे की वाहनधारक आऊटसाईडने वाहन टाकून वाहने चालवतात या रस्त्याने शेकडो विद्यार्थी ये-जा करत असून या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे हा रस्ता गेल्या काही महिन्यापूर्वीच दुरुस्ती केला होता परंतु संबंधित ठेकेदार हे दुरुस्तीचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे करत असल्यामुळे आणि यावर संबंधित अधिकारी यांचा कानाडोळा असल्यामुळे हा रस्ता वारंवार दुरुस्त करूनही खड्डेमय होत आहे त्यामुळे हा रस्ता दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसातच परत जैसे थे होतो यामध्ये या रोडवर खूप मोठ्या प्रमाणात मलिंदा मिळत असल्याकारणाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याकारणाने या रोडची स्थिती आज गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमुळे झालेली आहे करिता वरिष्ठांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन भोनगाव फाटा ते भोनगाव या रस्त्याचे खड्डे बुजून संबंधित कामावर जातीने लक्ष द्यावे अशी मागणी येथील प्रवासी वर्ग आणि वाहनधारकांकडून केल्या जात आहे. *या नुसार बातम्या आल्या पाहिजेत* …..



