भोंनगाव येथील आठवडी बाजारामध्ये विनापरणवणाधरक वाहन जप्त व चालकास अटक..

*
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
पोलिसाचे रात्रीच्या दरम्यान पेट्रोलियम करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक निलेश साहेबराव डाबेराव उपविपोअसा कार्यालय खामगाव यांच्या फिर्यादी नुसार विना परवानाधारक वाहन क्रमांक एम एच 28 ए.ई.1684 क्रमांकाचे वाहन बिना नंबर प्लेट सह भोंनगाव येथील आठवडे बाजारात अवैद्य रेती करणाऱ्या वाहतूक 407 ला पकडण्यात आले..वाहन चालकास वाहनाचे अधिकृत कागदपत्रे मागले असता त्याच्याजवळ कुठलीही कागदपत्रे मिळाले नाही.वाहन किंमत ४ लाख तसेच एक ब्रास रेती किंमत 4000 हजार रुपये असे ४ लाख ४ हजार रुपये वाहन तसेच अवैध एक ब्रास रेती जप्त करण्यात आली. आरोपी नाव शेख सलीम शेख बशीर वय 30 वर्षे रा. कवठळ ता. संग्रामपुर येथील असून,हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग चव्हाण यांनी आरोपीस अटक करून, आरोपी सध्यास्थीती – हवालात बंद आहे.अप नंबर 108/23 कलम 379 भा.द.वि. सह क. 158/177, 3(1)/181, 5/180, 50/177 मोटार वाहन कायाद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे… पुढील घटनेचा तपास शेगाव ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग चव्हाण करीत आहे.



