भुसावळ हादरलं !तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार, जबरदस्ती धर्म परिवर्तन करून निकाह ही लावला !

नाशिक धर्मांतर प्रकरणाची भुसावळ शहरात पुनरावृत्ती; तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार, जबरदस्ती धर्म परिवर्तन करून निकाहही लावला, भुसावळ हादरलं…!
करण्याचा तसेच धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात येत होता. विरोध केल्यावर तिच्यावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचाही आरोप आहे.
तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. सुरुवातीला भीतीमुळे पीडितेने पोलिसांना काहीही माहिती दिली नाही. मात्र सामाजिक संघटनांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिने संपूर्ण प्रकार उघड करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढे हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी आरोपी नविल शेख याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे भुसावळ शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, जबरदस्ती धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



