खामगाव परिसरात दमदार पाऊस.. जनुना तलाव तुडुंब भरले, शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी खामगाव-16 सप्टेंबर रोजी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या दमदार पावसामुळे शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे .तालुक्यातील शेत जमीन पाण्याखाली गेल्याने दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. तर शहरातील बोर्डिं नाल्याला पूर आल्याने सिंधी कॉलनी जनुणा रोड पुलावरून पाणी वाहताना दिसत आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मागील काही दिवसानंतर प्रथमच पावसाने 16 सप्टेंबर रोजी पहाटे दमदार हजेरी लावली व अचानक रुद्र रूप धारण केले होते. ते जवळ जवळ 2 तास सतत झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांची धांदल उडाली होती. संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून निसटल्याची भीती निर्माण झाली आहे. सतत च्या पावसाने शेती पाण्याखाली गेल्याने पिकांची नासाडी झाल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये केली जात आहे……✒️



