बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भाववृक्ष चळवळ घराघरात सुरु व्हावी.

संपादकीय लेख ( कराडे सर)

अकोला जिल्ह्यावर यावर्षी सुर्य जणुकाही खवळला असून आग ओकत आहे. दिवसा प्रचंड तापमान व रात्री असह्य उकाडा यामुळे प्रत्येक जण हैराण झाला आहे. यावर पर्याय म्हणून मागील दोन वर्षापूर्वी भाववृक्ष या व्हाट्सअप ग्रुपवर एक आवाहन करण्यात आले होते ते असे की, या ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने आपल्या घरीच वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा किंवा कोणत्याही एखाद्या वृक्षाची घरीच एखाद्या प्लास्टिक पिशवीत, गोण्यात किंवा कुंडीत लागवड करावी व एक वर्ष त्या वृक्षाची घरीच जोपासना करून दुसऱ्या वर्षी त्या वृक्षाची आपापल्या दृष्टीने योग्य अशा ठिकाणी लागवड करावी. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्या ग्रुपवरील बहुतांश सदस्यांनी तसे फोटो ग्रुपवर टाकले. ही चळवळ जर व्यापक बनली तर यातून पर्यावरणाची फार मोठी समस्या सुटेल. या चळवळीचा उद्देश असा होता की, तुमच्या घरातील जिवंत किंवा मृत कोणत्याही व्यक्तीच्या किंवा तुमचा ज्या देवावर भाव असेल त्या देवाच्या नावाने वृक्ष जगवणे आणि त्याचे संगोपन करणे. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आज अकोला जिल्ह्याची पर्यावरणाच्या बाबतीत फार वाईट अवस्था आहे. उत्तम पर्यावरणासाठी किमान 33 % जंगल असणे आवश्यक आहे पण अकोला जिल्ह्यात मागे वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार जिल्ह्यात फक्त 7% जंगल शिल्लक आहे. रस्ते रुंदीकरण, गौण खनीज उत्खनन, वाढते शहरीकरण सोबतच गावांच्या होणाऱ्या विस्तारामुळे लाखो झाडे कापल्या गेली आहेत.सोबतच सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे घरे व सिमेंट काँक्रीटचे किंवा पेव्हर्सचे रस्ते यामुळे प्रचंड तापमान वाढत आहे. देशी वृक्ष डौलदार असून ते उष्णता शोषून घेतात त्या उद्देशाने भाव वृक्ष व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा देशी वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात येऊन कुठल्याही गवगव्या शिवाय तशी चळवळ सुरु करण्यात आली असून ही चळवळ व्यापक बनण्याची नितांत गरज आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button